संसदेचे कामकाज सुरळीत
किरकोळ विक्री क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयास यासंबंधीचे मतभेद मिटण्यापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय औपचारिकरित्या सरकारने सर्वपक्षीय बैठकीत जाहीर केला. त्यानंतर १३ दिवसांनंतर संसदेचे कामकाज सुरळीत सुरू झालेले दिसून आले. विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आक्रमक रूप धारण केल्याने कामकाज चालू शकले नव्हते.
रिटेल क्षेत्रास तसेच राजकीय पक्ष आणि राज्यसरकार यांच्यात समन्वय घडवून आणेपर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीचा निर्णय स्थगित ठेवणार असल्याचे सर्वपक्षीय बैठकीला लोकसभेचे नेते व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. यूपीएचे घटक पक्ष तृणमूल कॉंग्रेस व द्रमुकनेही विदेशी गुंतवणुकीस विरोध व्यक्त केला होता.