नीलेश राणेंना अटक

0
91

माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात काल येथे जोरदार निदर्शने केल्याने पोलिसांनी राणे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. कोकण रेल्वेच्या समस्यांचा विसर पडल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत होते. रेल्वेमंत्री कालपासून रत्नागिरीच्या दौर्‍यावर आहेत. काल ते नागरी सत्काराला जात असतेवेळी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारुती मंदिराजवळ त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कार्यकर्त्यांसह राणे यांना ताब्यात घेतले.