तिरंदाजीत भारताला रौप्य पदके

0
145

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघांना दक्षिण कोरिया संघांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष संघाचा दक्षिण कोरियाविरुद्ध झालेला अंतिम सामना रोमहर्षक झाला होता. परंतु चौथ्या सेटसाठी दोघांमध्ये बरोबरी झाली आणि अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन साईनी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला शूटआऊटमध्ये पराभूत व्हावे लागले. दरम्यान, महिलांच्या कंपाऊंड प्रकारातही भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हा सामनाही अटितटीचा झाला होता. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी, ज्योती वेनमचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाला २३१-२२८ अशा ३ गुणांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले.