तारांकित हॉटेल्स, शाळांचा एफएआर : आज निर्णय शक्य

0
103

नगर नियोजन खात्याने राज्यातील चार पंचतारांकित हॉटेले व शिक्षण संस्थांच्या इमारतीसाठी अतिरिक्त २० टक्के एफएआरची सवलत देण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. राज्यातील शाळा इमारतींचा एफएआर वाढविण्याची अत्यंत गरज होती. अनेक शाळा व्यवस्थापनांकडून तशी मागणी आली होती. शाळा इमारतींचा एफएआर वाढविल्याने त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही, असे वेगवेगळ्या अभियंत्यांचेही म्हणणे होते. वरील प्रस्तावाचा राज्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना फायदा होऊ शकेल.