मुख्तार अब्बास नकवी यांना जामीन मंजूर

0
82

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना काल येथील न्यायालयाने निर्बंधात्मक आदेशांचे उल्लंघन प्रकरणी जामीन मंजूर केला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी निर्बंध असतानाही प्रचारा दरम्यान मोर्चाचे नेतृत्व केल्याचा ठपका ठेवून नकवी यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या निवाड्याला नकवी यांनी आव्हान दिले असता त्याला स्थगिती देण्यात आली व त्यांना जामीन मंजूर झाला.