..तर शेतकरी पीक जाळतील ः टिकैत

0
113

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी काल गरज पडल्यास शेतकरी त्यांचे पीक जाळतील पण आंदोलन सुरू ठेवतील असा इशारा सरकारला दिला. केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांजवळ ८४ दिवस आंदोलन सुरू आहे. काल शेतकर्‍यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरणायामध्ये बोलताना टिकैत यांनी आंदोलक शेतकरी मागे घटणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल असे टिकैत म्हणाले.