…तर भारत-ऑस्ट्रेलियातील नातेबंध अधिक समृध्द

0
87
क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात मित्रत्वाचे आगळे बंध आहेत आणि या देशांमधील राज्ये व शहरे यांच्यात योग्य आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण झाल्यास उभय देशांदरम्यानचे नातेबंध अधिक समृध्द बनतील, असा आशावाद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे व्यक्त केला.मोदी यांच्या विद्यमान ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय दौर्‍याचा प्रारंभ काल ब्रिस्बेनहून सुरू झाला. येथे उभारलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याआधी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. क्वीन्सलँडचे प्रमुख कॅम्पबेल न्यूमॅन यांनी मोदी यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मोदी यांनी पुढे सांगितले की राज्य व शहरे यांच्यातील उपक्रमोविषयी देवाण-घेवाणीचे आम्ही खरोखरच स्वागत करतो. अद्ययावत तंत्रज्ञानासाठी जगात ब्रिस्बेन शहर प्रसिध्द ठरले आहे. तर भारतातील हैदराबाद हे शहर सायबराबाद म्हणून संबोधले जाते. त्यामुळे या शहरांमध्ये आता बहिणींसारखे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे साहजिकचे राज्ये व शहरे यांच्यात आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण वाढल्यास दोन्ही देशांदरम्यानच्या नात्यात अधिक बळकटी निर्माण होईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. त्याआधी या दौर्‍यातील पहिल्या द्विपक्षीय उपक्रमाचा भाग म्हणून मोदी यांनी महत्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. भारत व क्वीन्सलँड यांच्यातील तंत्रज्ञान व संशोधन या क्षेत्रातील भागीदारीची त्यांनी यावेळी प्रशांसा केली. यावर्षी क्वीन्सलँडची अनेक व्यापारी शिष्टमंडळे भारताला भेट देणार आहेत. भारताच्या विकासाला ही बाब पोषक ठरेल असे ते म्हणाले. याचे श्रेय कॅम्पबेल न्यूमन यांना द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जी- २० परिषद आयोजित केल्याबद्दल मोदी यांनी ब्रिस्बेनचे अभिनंदन केले.