Home Featured तरुणीने तरुणाला ब्लॅकमेल करत उकळले दीड कोटी रुपये

तरुणीने तरुणाला ब्लॅकमेल करत उकळले दीड कोटी रुपये

0

आरोसी-कासावली येथील एका 40 वर्षीय तरुणाला ब्लॅकमेल करत तरुणीने त्याच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्लॅकमेलिंगच्या जाचाला कंटाळून वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
मुरगाव तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोसी-कासावली येथे राहणाऱ्या एका तरुणाचे 2020 ते 2022 या दरम्यान एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. नंतर त्यांच्यात अनेक वेळा भेटीगाठी झाल्या. याचा फायदा घेऊन त्या तरुणीने दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केला आणि नंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून ती पैसे उकळू लागली. त्या तरुणीने एकूण 1 कोटी 35 लाख रुपये ब्लॅकमेल करत उकळल्याचे सदर तरुणाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. वेर्णा पोलिसांनी तक्रार नोंदवून सदर तरुणीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. वेर्णा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.