… तरीही धोकादायक घरांत राहण्यालाच ‘त्यांची’ पसंती

0
85

गुरुवारी रात्री काटे-बायणा किनार्‍यावरील चार झोपडीवजा घरे समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने वाहून गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तेथील अन्य घरमालकांना त्वरित स्वत:हून घरे खाली करण्याचा आदेश दिला असूनही त्या सर्वांनी ‘त्या’ घरांतच राहणे पसंत केल्याचे निदर्शनास आले. या किनार्‍यावरील १२१ बेकायदेशीर झोपडीवजा घरांना सीआर्‌झेड्‌ने घरे खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. गुरुवारच्या घटनेनंतर वास्कोचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, आपत्कालीन विभाग व वास्को पोलीस स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, वरील भागाची काल पाहणी केली असता तेथील कोसळलेल्या आपल्या घरांकडे त्या घरांचे मालक पाहणी करीत होते.
इतर घरांचे मालक कुटुंबियांसह आपल्या घरांना वाचवण्यासाठी रेती भरलेल्या पिशव्यांचा टेकू देण्याच्या कामात मग्न होते. विशेष म्हणजे गुरुवारी रात्रीप्रमाणेच कालही समुद्राच्या लाटा या घरांवर आदळत असल्याचे दिसून आले. उर्वरीत घरांनाही वाहून जाण्याचा धोका आहे.