तमनार वीज प्रकल्पप्रकरणी पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी

0
78

गोवा फाऊंडेशन तसेच ज्या जमीन मालकांची जमीन तमनार वीज प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे त्यांनी तमनार ४०० केव्ही वीज वाहिनी प्रकल्पासंबंधी मुंबइं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी काल खंडपीठाने स्थगित केली. आता ही सुनावणी ६ एप्रिलला होणार आहे.

वरील प्रकल्पाला केंद्रीय वीज प्राधिकरणाने जी गेल्या २८ नोव्हेबर २०१८ ला मान्यता दिली होती त्याला अर्जदाराने न्यायालयात आव्हान दिलेले आहे. या प्रकरणी न्यायालयाने गोवा सरकार, केंद्र सरकार व तमनारला २२ मार्च २०२१ पर्यंत आपला आक्षेप नोंदवण्यास वेळ दिला आहे.

अर्जदारांनी आपल्या अर्जातून या प्रकल्यामुळे वनक्षेत्र व वन्यजीव यांच्यावर थेट परिणाम होणार असून या वनक्षेत्रातील १,३१,०८२ झाडांना संरक्षण मिळण्याची गरज व्यक्त केली आहे. या प्रकल्पाचे कोणतेही काम पुढे नेण्यावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.