ड्रग्स गैरव्यवहार : मंत्र्यांच्या संबंधप्रकरणी चौकशीचे आदेश

0
103

कॉंग्रेस नेत्यांनी सरकारातील मंत्री अमली पदार्थांच्या गैरव्यवसायाला मदत करीत असल्याचा आरोप केल्याने मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी पोलिसांना वरील प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पार्सेकर यांनी पोलीस महानिरीक्षक मोहनन व उपमहानिरीक्षक सुनिल गर्ग यांची बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा केली. अंमली पदार्थ गैरव्यवहार व पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसांची बैठक घेण्याचे पार्सेकर यांनी परवा मंगळवारी पत्रकारांना सांगितले होते. किनारी भागातील अमली पदार्थांच्या गैरव्यवहारात मंत्री गुंतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता.