ई-व्हिसा, व्हिसा ऑन अरायव्हल योजनेतील त्रुटी दूर करणार

0
199

दाबोळी विमानतळावर सुरू केलेल्या ई-व्हिसा व विमानातून उतरल्यानंतर विदेशी पर्यटकांना तात्काळ व्हिसा देण्याच्या योजनेत त्रुटी आढळून आल्यास त्यात सुधारणा करणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले. पर्यटनमंत्र्यांनी काल सचिवालयात पर्यटन संचालक अमेय अभ्यंकर, तसेच विमानतळ प्राधिकरणचे संचालक अमेय अभ्यंकर, तसेच विमानतळ प्राधिकरणे संचालक के. डी. राव व टुर्स ऍन्ड ट्रॅवल्सचे अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा व अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वरील योजनेचा आढावा घेतला. सध्या राज्यात पर्यटकांची गर्दी वाढली असून वरील सुविधेत सुधारणा करण्यासाठी संबंधितांकडून माहिती घेतल्याचे परुळेकर यांनी सांगितले. आतापर्यंत ३७५ विदेशी पर्यटकांनी वरील सुविधेचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.