डॉ. तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष

0
3

>> 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान रंगणार साहित्य संमेलन

सरहद, पुणे आयोजित दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडीअम, दिल्ली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे काल रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम
राहिले.