भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी डिसेंबरपर्यंत प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. भाजपच्या खासदारांशी चर्चा करत नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च महिन्यातच कोरोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व तयारी करण्यास सांगितले होते. भारताने फक्त ९ महिन्यांतच कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन भारतीय लशी तयार केल्या. आतापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी त्या घेतल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटी सर्व देशातल्या नागरिकांना लस देण्यात येईल यासाठी वेळ निश्चित केली जात असल्याचे नड्डा यांनी सांगितले. केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसीविरची उपलब्धता आणि पुरवठा सुनिश्चित केला आहे. सर्व राज्यांना आवश्यक मदत पाठविली जात असल्याचेही ते म्हणाले.