टोकियो पॅरालिम्पिकच्या कार्यक्रमात बदल नाही

0
113

टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीने काल सोमवारी पुढील वर्षी होणार्‍या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. ही स्पर्धा पुढील वर्षी २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत घेण्याचे निश्‍चित केले आहे. परंतु पॅरालिम्पिकच्या कार्यक्रमात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणेच पुढील वर्षी ही स्पर्धा होणार आहे.

कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे टोकियोत यंदाच्या जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित ऑलम्पिक आणि पॅरालम्पिक स्थगित करून पुढील वर्षार्पंयत पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. पॅरालिम्पिकचे आयोजन २१ स्थानांवर होणार असून त्यात २२ खेळांच्या ५३९ स्पर्धा होणार आहेत. पहिले पदक पॅरालिम्पिक खेळाच्या शुभारंभानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच २५ ऑगस्टला महिला सायक्लिंगमध्ये दिले जाईल. पॅरालिम्पिकचा उद्घाटन आणि समारोप सोहळा ऑलम्पिक स्टेडियममध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत होणार आहे.