नाशिक शहरातील चर्चेत असणारे टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी 25 दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. तिला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर काल तिला न्यायालयात हजर केले असता, तिला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 मार्चपासून निदा खान होती फरार
नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरण समोर आल्यापासून पोलिसांकडून निदा खानचा शोध घेतला जात होता. 25 मार्चपासून ती फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु न्यायालयाने तिला दिलासा दिला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध मोहिमेला आणखी वेग दिला होता.