Home बातम्या झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळून 4 जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळून 4 जणांचा मृत्यू

0

झारखंडमध्ये शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रामगड जिल्ह्यातील महुआ टांगरी येथे काल रविवारी सकाळी एक बेकायदेशीर कोळसा खाण कोसळली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. सोमवार सकाळपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात जोरदार पावसाची यंत्रणा सक्रिय असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे मांडला जिल्ह्यात नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. नरसिंहपूर ते होशंगाबादला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोसळला.