Home Featured ज्येष्ठ साहित्यिक वगझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक वगझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

0

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, गझलकार अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर (६१) यांचे काल रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतिभावंत कवी, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र टाईम्समध्ये ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. मूळ वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील मधुसूदन नानिवडेकर हे सध्या कणकवली तरळे येथे वास्तव्यास होत. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यिक वर्तुळातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.