जूनमधील सर्वाधि कोरोना रुग्णांची नोंद

0
12

राज्यात जून महिन्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, चोवीस तासांत या महिन्यातील आत्तापर्यंतचे सर्वाधिक नवीन ११२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६१४ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.१४ टक्के एवढे आहे.

या महिन्यात दुसर्‍यांदा शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. तसेच, या महिन्यात एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासांत नवीन १२२५ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यातील ११२ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३३ एवढी आहे. चोवीस तासांत एकाही बाधिताना इस्पितळात दाखल करावे लागलेले नाही. मागील चोवीस तासांत आणखी ६७ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२० टक्के एवढे आहे.