जुना मांडवी पूल शनिवार, रविवारी वाहतुकीस बंद

0
16

जुना मांडवी पूल शनिवार दि. 11 ते रविवार दि. 12 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्या. 6 वाजेपर्यंत या पुलाच्या देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात अवजड वाहतूक अटल सेतू मार्गे आणि हलकी वाहने नवीन मांडवी पुलावरून वळविली जातील. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढला आहे.