अपात्रता याचिकेवर आज होणार सुनावणी

0
8

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाच्या 8 फुटीर आमदारांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर शुक्रवार दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास विलंब केला जात असल्याने चोडणकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अपात्रता याचिकेवर जलदगतीने सुनावणी घेण्याचे सभापतींना निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.