जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगोचे आठ उमेदवार जाहीर

0
124
मगोच्या उमेदवारांसमवेत साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप व मगोचे पदाधिकारी. (छाया : किशोर स. नाईक)

म. गो. अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दि. १८ मार्च रोजी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या आठ उमेदवारांची निवड काल जाहीर केली. आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी यावेेळी बोलताना केला.
सांताक्रुझ मतदारसंघासाठी दीक्षा कवळेकर, चिंबल – संदीप वेर्णेकर, वेलिंग-प्रियोळ – शिवदास गावडे, बेतकी खांडोळा – बबिता गावकर, कुर्टी-खांडेपार – मोहन वेरेकर, सांकवाळ – अपर्णा नाईक, बार्शे – विठोबा वेळीप, कवळे – चित्रा फडते हे उमेदवार मगो पक्षातर्फे निवडणूक लढवतील. गांजे उसगाव मतदारसंघासाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया चालू असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री प्रकाश वेळीप हजर होते. युतीच्या सर्व उमेदवारांसाठी आपण प्रचार करणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले. वेळीप मगो प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. पक्षाने सध्या २६ मतदारसंघात काम सुरू केले असून पक्ष सदस्य नोंदणी अभियानला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. ढवळीकर म्हणाले.