खाण अवलंबितांना बंदीपूर्व काळातील ४ महिन्यांची भरपाई

0
101

सरकारची तयारी; ५० कोटींचा बोजा
खाण व्यवसाय बंद होण्याअगोदरच्या चार महिन्यांच्या काळासाठीही खाण अवलंबितांना आर्थिक मदत देण्याची तयारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ठेवली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आणखी ५० कोटींचा अतिरिक्त भार पडेल.
खाण व्यवसाय शक्य तितक्या लवकर सुरू व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले होते. प्रत्यक्षात हा व्यवसाय खरोखरच पूर्वीप्रमाणे सुरू होईल की नाही, याबाबतीत खाण अवलंबितांसमोर प्रश्‍न आहे.मिळालेल्या माहितीनुसार खाण व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग मोकळे झालेले असतानाही काही खाण कंपन्यांनी कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याचे सत्र सुरू केल्याचे कळते. त्यामुळे खाण अवलंबितांचा या व्यवसायासंबंधिचा संशय बळावला आहे.