‘जिओ ट्रू 5जी’ सेवा पणजीत सुरू

0
8

>> 17 राज्यांतील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5जी सेवेला प्रारंभ

रिलाअन्स जिओकडून काल एकाचवेळी 50 शहरांत ‘जिओ ट्रू 5जी’ सेवा सुरू करण्यात आली. त्यात 17 राज्यांतील शहरांसोबत केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. या 17 शहरांमध्ये गोव्याची राजधानी पणजी शहराचाही समावेश असून, काल ‘जिओ ट्रू 5जी’ सेवेशी पणजी शहर जोडले गेले. आतापर्यंत एकूण 184 शहरापर्यंत जिओची ट्रू 5जी सेवा पोहोचली आहे.
गोव्यामध्ये 5जी सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच आणि एकमेव ऑपरेटर आहे. पणजी शहरातील जे ग्राहक ‘जिओ ट्रू 5जी’ सेवा वापरणार आहेत, त्यांना वेलकम ऑफरचा लाभ घेता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1जीबीपीसपर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल, असे जिओच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

पणजीमध्ये जिओची 5जी सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून, पणजी शहरात 5जी सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे, असे जिओच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आम्ही जिओ ट्रू 5जी तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजी आणि गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोवा डिजिटल करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल गोवा सरकारचे आभारी आहोत, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.

5जी सेवेसाठी सिम कार्ड बदलण्याची गरज नाही
जिओ ट्रू 5जी सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5जी नेटवर्क सुसंगत 5जी मोबाईल, राहत्या किंवा कामाच्या ठिकाणी 5जी नेटवर्कची उपलब्धता, तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल.