जलशक्ती मंत्रालय राबवणार
जलसंधारण मोहीम ः मोदी

0
178

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रविवारी सकाळी ११ वाजता आपल्या मासिक ‘मन की बात’च्या ७४ व्या भागात देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी जलसंधारणाचे महत्त्व सांगताना जलशक्ती मंत्रालय लवकरच ‘कॅच द रेन’ नावाची जलसंधारण मोहीम राबवणार असल्याचे जाहीर केले.

‘कॅच द रेन’ मोहिमेबाबत बोलताना मोदींनी कधीही आणि कुठेही पाऊस पडो, कॅच द रेन असा नारा असल्याचे सांगितले. प्रत्येक संस्कृतीत असलेले पाण्याचे आणि जलसंचयाचे महत्त्व असल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बोलताना पंतप्रधानांनी, स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी हा दिवस आदरणीय वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्याला आणि त्यांचा ‘रामन इफेक्ट’ शोधासाठी समर्पित केला. यावेळी मोदी यांनी तामिळ भाषेची गोडवी गायिली मात्र यावेळी त्यांनी आपल्याला तामिळ भाषा येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.