जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
281

भारताचे जवान आणि दहशतवाद्यांत जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपिया जिल्ह्यातील सुगन परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांच्या पथकाने संपूर्ण परिसर वेढला असल्याचे कळताच लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही गोळीबार केला. यात दोन दङसतावीद ठार झाले. ही चकमक रात्री उशिरापर्यंत चालू होती. दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले होते. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.