९ मृत्यूंसह राज्यात ४३२ पॉझिटिव्ह

0
273

>> कोरोनाने सात दिवसांत ४९ जणांचा बळी

राज्यात चोवीस तासात नवे ४३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४७७ झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७० एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४७४९ एवढी झाली आहे.

सात दिवसांत ४९ जणांचा बळी
राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या सात दिवसांत ४९ रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासांत नऊजणांचा बळी गेला आहे. इस्पितळात उपचारासाठी दाखल केल्यानंतर दहा तासांच्या आत तीन रुग्णांचा मृत्यू झाला. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, मडगाव येथील कोविड इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राय येथील ७५ वर्षांचा पुरुष, फोंडा येथील ६० वर्षांची महिला, कुडचडे येथील ६५ वर्षांचा पुरुष, बार्देश येथील ५२ वर्षांचा पुरुष, उत्तर गोव्यातील ७४ वर्षांचा पुरुष, बेताळभाटी येथील ४८ वर्षांचा पुरुष, करमळी येथील ७० वर्षांचा पुरुष, बेती येथील ६१ वर्षांचा पुरुष आणि वास्को येथील ४३ वर्षांची महिला रुग्ण यांचे निधन झाले आहे.

३९४ रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह आणखीन ३९४ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ४४४ एवढी झाली आहे. कोविड प्रयोगशाळेत १८२० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३२२ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ७१ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजीत नवे २३ रुग्ण
पणजी परिसरात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रकार सुरूच असून चोवीस तासांत नवे २३ रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील रुग्णांची एकूण संख्या १९१ एवढी झाली आहे.
येथील मच्छीमारी खात्याच्या कार्यालयाजवळील एका खासगी कंपनीच्या जेटीवरील पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. भाटले, पणजी शहर परिसर, सांतइनेज, आल्तिनो, मिरामार, सांतइनेज बांध, करंजाळे, पाटो- पणजी आदी भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.