जमिनीच्या अनुपलब्धतेमुळे केंद्राच्या १५० मेगावॅट सौरऊर्जेचे उद्दिष्ट कठीण

0
91

>> वीजमंत्र्यांची माहिती

 

केंद्र सरकारने २०२१पर्यंत किमान १५० मॅगावॅट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट सरकारला दिले आहे. त्यासाठी आवश्यक ती जमीन उपलब्ध नसल्याने ते पूर्ण करणे कठीण आहे. परंतु सरकारने केंद्र सरकारच्या उजाला योजनेखाली एलईडी बल्बांचे वितरण सुरू केले
आहे.
पंधरा लाख बल्बांचे वितरण झाल्यानंतर ७७.८ दशलक्ष विजेच्या युनिटांची बचत होईल. त्याचप्रमाणे रस्त्यावरील विजेसाठीही एलईडीचा वापर करण्याची योजना आहे. त्यातून ३७ लाख २१ हजार विजेत्या युनिटांची बचत होईल, असे सांगून विजेची बचत करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने आवश्यक ते उपाय घेतल्याचे वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी काल विधानसभेत आमदार किरण कांदोळकर यांच्या प्रश्‍नावर सांगितले.
सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर देण्याचे ठरविले आहे. पारंपरिक ऊर्जा, डिझेल, कोळसा यावर तयार होते. परंतु भविष्यकाळात त्याचा साठा संपेल. त्यामुळे विजेची बचत महत्वाची आहे, असे वीजमंत्र्यांनी सांगितले.