Home बातम्या जबानीत दोन अधिकाऱ्यांचीनावे सांगितली : पूजा नाईक

जबानीत दोन अधिकाऱ्यांचीनावे सांगितली : पूजा नाईक

0

गुन्हा अन्वेषण विभागाला दिलेल्या जबानीत दोन अधिकाऱ्यांची नावे सांगितली आहेत. आपल्याला नोकरभरती घोटाळा प्रकरणात पहिल्यांदा अटक झाली होती. त्यावेळी आपण त्या अधिकाऱ्यांची नावे पोलिसांना दिली होती, असे सरकारी नोकरभरती घोटाळ्यातील एक संशयित आरोपी पूजा नाईक हिने काल जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने त्या दोन अधिकाऱ्यांशी आपली ओळख करून दिली होती, असेही पूजा नाईक हिने म्हटले आहे.

राज्य सरकारच्या विविध खात्यांतील भरतीसाठी त्यांच्याकडून अर्ज स्वीकारले जात होते. आपण विविध खात्यांत भरतीसाठी 613 नोकरीचे अर्ज सादर केले होते आणि त्या दोघा अधिकाऱ्यांकडे एकूण 17.68 कोटी रुपये रोख स्वरूपात दिले होते. 2012-13 मध्ये मंत्री असताना त्या मंत्र्याने त्या अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती. सध्याच्या सरकारमध्येही तो मंत्री आहे. तथापि, त्या मंत्र्याचे नाव जाहीरपणे सांगण्यास पूजा नाईकने नकार दिला.