जनसुनावणीसाठी मोपा विरोधकांची मोर्चेबांधणी

0
135

दि. १ रोजी शेमेचे आडवण येथे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्‍नावर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जनतेच्या सूचना ऐकून घेण्यासाठी निश्‍चित केलेल्या जनसुनावणीच्यावेळी मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीने सुमारे दोन हजार नागरिकांना घेऊन जाण्याचे ठरविले असून पर्यावरणाच्या बाबतीत संबंधित कंपनीने तयार केलेला अहवाल कसा चुकीचा आहे ते पटवून देणार असल्याचे समितीचे अध्यक्ष संदीप कांबळी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत वारखंड, चांदेल, कासारवर्णे या भागातील शेतजमीन विमानतळासाठी ताब्यात घेऊ देणार नाही, असा इशारा कांबळी यांनी दिला. सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.