Home बातम्या ‘जनभागीदारी’मध्ये 25 गावांची निवड

‘जनभागीदारी’मध्ये 25 गावांची निवड

0

जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समूहातील 25 गावे निवडण्यात आली आहेत. या 25 गावातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. जनभागीदारी अभियानाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या गावांना सरकारच्या 18 मंत्रालयाच्या योजना, सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एसटी समुदायाला नेटवर्क सुविधा, शेतकऱ्यांना कृषी कार्ड, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी सरकारी खात्याच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत केली जाणार आहे. तसेच, अनुसूचित जमाती समुदायाशी संबंधित वन हक्क कायद्याखालील (एफआरसी) प्रलंबित प्रकरणे त्वरित निकालात काढण्याकडे लक्ष दिले जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.