चोवीस तासांत राज्या नवे १० कोरोनाबाधित

0
12

राज्यात चोवीस तासांत नवीन १० कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र, आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या ६७ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ६४६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी ११ जण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के एवढे आहे.