पणजीतील ७६ सरकारी इमारतींव सौर ऊर्जा पॅनल बसवणार : सुदिन

0
18

गोवा सरकारच्या नवीन अक्षय व ऊर्जा खात्याने ‘इमेजीन पणजी स्मार्ट सिटी’ अंतर्गत पणजी शहरातील ७६ सरकारी इमारतींवर सौर ऊर्जेसाठीचे पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारचा हा ‘पायलट प्रॉजेक्ट’ असून त्यासाठी अक्षय व ऊर्जा खात्याने ९ कोटी रु.ची निविदा काढली असल्याची माहिती काल खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

पणजी शहरातील सरकारी इमारतींनंतर पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पावरही सौर ऊर्जेसाठीचे पॅनल बसवण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी गोवा विधान सभागृहाची तसेच सभापतींच्या परवानगीची आवश्यकता भासणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच विधानसभा प्रकल्प इमारतींवर हे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले मात्र, पहिल्या टप्प्यात पणजीतील ७६ सरकारी इमारतींवर हे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे आणि इमेजीन पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे.

सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथे नवीन अक्षयव ऊर्जा खात्यातर्फे आयोजित एका कार्यक्रमात सरकारतर्फे मडगांव, मुरगाव व सांगे या नगरपालिकांना तसेच मोप विमानतळ विकास प्राधिकरणाला इलेक्ट्रिक चारचाकी गाड्या दिल्या. यावेळी मंत्र्यानी मडगाव, मुरगांव व सांगे पालिका अध्यक्षांकडे गाडीच्या चाव्या सुपूर्द केल्या. मोप विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनीही यावेळी मंत्र्यांकडून चाव्या स्वीकारल्या. समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हेही यावेळी हजर होते.

इलेक्ट्रीक वाहनांच्या
वापराचे आवाहन

यावेळी बोलताना ढवळीकर म्हणाले की, विजेवर चालणार्‍या गाड्यांमुळे प्रदूषण होत नाही. तसेच त्या पेट्रोलवर चालणार्‍या गाड्यांपेक्षा जास्त फायदेशीर ठरतात. मडगावहून पणजीला जाण्यासाठी ५० ते ६० रु.चे पेट्रोल खर्च होते. मात्र, विजेवर चालणार्‍या दुचाकीचा त्यासाठीचा खर्च हा केवळ ३ रु. एवढा असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रदूषण मुक्त असलेल्या ह्या इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त लोकानी वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी के