चोवीस तासांत राज्यात २.४६ इंच पावसाची नोंद

0
107

राज्यात चोवीस तासांत पणजी शहरात ५.३५ इंच पावसाची नोंद झाली. तर, राज्यभरात २.४६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ३६.७९ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवार २८ जूनपासून पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजधानी पणजीला जोरदार पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. पणजीबरोबरच ओल्ड गोवा येथे ४.९० इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे ३.७५ इंच, पेडणे येथे १.५७ इंच, साखळी येथे १.६२ इंच, वाळपई येथे २.०६ इंच, काणकोण येथे १.५१ इंच, दाबोली येथे २.६४ इंच, मडगाव येथे १.३० इंच, मुरगाव येथे २.१८ इंच, केपे येथे १.०७ इंच, सांगे येथे २.०१ इंच पावसाची नोंद झाली आहे.