चोवीस तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, १०७ बाधित

0
37

राज्यात आज बुधवार व उद्या गुरूवार असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्यामुळे राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. पूर्व राजस्थान, परिसरावरील कमी दाबाचे क्षत्र निवळलेले आहे तर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनार्‍यालगत समुद्र सपाटीपासून ५८ किलोमीटर उंचावर चक्राकार वार्‍याची स्थिती आहे.
मंगळवारी सकाळी राजधानी पणजीला पावसाने झोडपले. तसेच राज्यात वातावरण ढगाळ दिसून येत होते.

आज व उद्या अलर्ट
राज्यात आज व उद्या हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वातावरणातील बदलामुळे सलग तिसर्‍या वर्षी परतीच्या पावसाला विलंब झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो. मात्र यावर्षी मान्सूच्या परतीच्या पावसासाठी सप्टेंबर अखेर उजाडणार आहे. पश्‍चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस लांबण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्ते केली आहे.