देशपातळीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

0
35

>> देशात २४ तासांत २६,११५ बाधित; २५२ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत देशात २६,११५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे दशता सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ९ हजार ५७५ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. याच कालावधीत कोरोनामुळे २५२ जण मृत्युमुखी पडले.कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ४,४५,३८५ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

तसेच आतापर्यंत एकूण ३,२७,४९,५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.७५ टक्के इतके आहे. मार्च २०२० पासूनचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

८१ कोटी लसीकरण
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या ८१ कोटी ८५ लाख १३ हजार ८२७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ९६ लाख ४६ हजार ७७८ वर पोहोचली आहे.

ऑक्टोबरपासून लशींची निर्यात
‘लस मैत्री’ कार्यक्रमांतर्गत, तसेच ‘कोव्हॅक्स’ जागतिक सेतूबाबत आपली बांधिलकी निभावण्यासाठी भारत येत्या ऑक्टोबर महिन्यापासून अतिरिक्त कोरोना प्रतिबंधक लशींची निर्यात पुन्हा सुरू करणार अशल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. मात्र याचवेळी आपल्या स्वत:च्या नागरिकांचे लसीकरण करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी मांडवीय यांनी स्पष्ट केले.
ऑक्टोबरमध्ये सरकारला कोरोना लशींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळणार आहेत. तर येत्या तीन महिन्यांत १०० कोटींहून अधिक डोस मिळतील. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींची संख्या ८१ कोटींपलीकडे केली असून, अखेरच्या १० कोटी लशी केवळ ११ दिवसांत देण्यात आल्याचीही माहिती यावेळी माडंवीय यांनी दिली.

कोव्हिशिल्ड लशीला ब्रिटन
सरकारची मान्यता नाहीच

भारतात दिल्या जाणार्‍या कोव्हिशिल्ड लशीला ब्रिटन सरकारने मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. याला भारत सरकारने जोरदार आक्षेप घेत नाराजी नोंदवली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोव्हिशिल्डला मान्यता न देण्याच्या ब्रिटनच्या निर्णयावर आक्षेप घेत हा भारतीय नागरिकांवर अन्याय करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतातून कोव्हिशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनादेखील ब्रिटनमध्ये सक्तीचे क्वारंटाईन सहन करावे लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील बहुतांश देशांनी कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे. मात्र ब्रिटनने नवे नियम तयार केले असून त्यातून कोव्हिशिल्डला वगळण्यात आले आहे.

भारताचा जोरदार आक्षेप
ब्रिटन सरकारचा हा निर्णय भेदभाव करणारा असल्याची प्रतिक्रिया भारत सरकारने दिली आहे. भारताने जोरदार आक्षेप नोंदवल्यानंतर ब्रिटन सरकारने चर्चेद्वारे हा प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन दिले आहे.