चोर्ला घाटात तब्बल चार तास वाहतूक कोंडी

0
14

>> अवजड मालवाहू ट्रक उलटल्यामुळे चोर्ला – बेळगाव रस्ता बंद

>> गोवा-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प

दीपावलीच्या सुट्टीमध्ये गोव्यात आलेले पर्यटक आपापल्या घरी परत असल्यामुळे काल रविवारी गोवा-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर बहुतेक वेळा गणेश चतुर्थी, दीपावली उत्सव किंवा जोडून सुट्‌ट्या आल्या तर वाहतूक समस्या निर्माण होतात.

गोव्याचा विचार केला तर पणजी अटल सेतूनंतर पर्वरीपर्यंत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. दिवाळीनिमित्त कोकणात गेलेले पर्यटक आणि चाकरमानी परतीच्या मार्गावर असल्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

विचित्र अपघात
रविवार हा सुट्टीचा दिवस आणि त्यात दीपावलीच्या सुट्टी संपत आल्यामुळे महामार्गावर प्रचंड गर्दी होती. अशातच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात विचित्र अपघात घडला.
एका ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक आणखी खोळंबून राहिली.