चोर्ला घाटातील अपघातात होंड्याचा युवक ठार

0
96

चोर्ला घाट जांभळीकडे येथील ट्रक व मोटारसायकल अपघातात होंडा नारायणनगर येथील अमोल परशुराम पाटील (वय २५) ठार झाला.

अमोल हा जीए ०४ डी. ३२२४ ह्या क्रमांकाची सीबीझेड मोटारसायकल येऊन चोर्ला बेळगाव ह्या दिशेने जात होता तर जीए ०४ टी ३५८३ ह्या क्रमांकाची ट्रक प्रसाद गोपाळ नाईक हा घेऊन चोर्ला केरी घाट उतरत होता. सकाळी ११.२५ वा. जांभळीकडे वळणावर या वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. ट्रक रस्त्याच्या बाजुला गेला तर अमोल हा जागीच ठार झाला. त्याला साखळी सरकारी हॉस्पिटलात नेण्यात आले व नंतर शवचिकित्सा करण्यासाठी गोमेकॉ बांबोळी येथे पाठविण्यात आले.