चेन्नईला बदली खेळाडू सापडेना

0
153

जोश हेझलवूड याने आयपीएलच्या तोंडावर अंग काढून घेतल्याने चेन्नई सुपर किंग्जचा संघ बदली खेळाडूच्या शोधात आहे. परंतु, सीएसकेचे पाच सामने मुंबईत होणार आहेत. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सीएसके संघात दाखल होण्यास खेळाडू इच्छुक नाहीत. सीएसके संघाने जोश हेझलवूडची जागा भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज बिली स्टेनलेक याच्यासोबत संपर्क साधला होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्याने भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यानंतर त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या रिस टॉप्ली याला देखील सीएसके संघातून खेळण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्याने देखील खेळण्यास नकार दिला आहे.