घरफोडी : म्हापशात सात महिलांना अटक

0
6

म्हापसा परिसरात घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तपासकाम जोरात सुरू केले आहे. चोरी प्रकरणी भंगार गोळा करण्यास फिरणाऱ्या महिलांचा हात असल्याचा संशय आहे. या संशयावरून दोन घरांतील चोरी प्रकरणी 7 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे, तर तिसऱ्या चोरी प्रकरणात सहभागी भंगार गोळा करणाऱ्या महिलांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये सरोजा अशोक पवार (गिरी), सुबच्चा ईश्वर लमाणी (गिरी), रेणुका सदानंद चिक्रे (माडेल – विवी) यांचा समावेश आहे. सर्व संशयित मूळ गदग, कर्नाटकातील आहेत. मयडे येथे शनिवारी दोन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी धातूचे नळ व इतर वस्तू मिळून अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गदरा – कर्नाटक येथील तीन महिलांना अटक केली
आहे.

दि. 6 रोजी गावातून भंगार गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या महिलांचा चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करून लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. काणका येथे रविवारी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह किमती ऐवज लंपास केला होता. दोन घटनांमध्ये भंगार गोळा करणाऱ्या 7 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.