गोव्याला विशेष राज्य दर्जावर आज चर्चा शक्य

0
40

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना चालू विधानसभा अधिवेशनात गोव्याला विशेष राज्य दर्जा मिळवण्याच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी आज १२ एप्रिल रोजी वेळेची तरतूद केल्याची माहिती दिल्याचे गोवाज मुव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस (जीएमएफएसएस) या संघटनेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या अनुषंगाने या संघटनेच्या गाभा समितीने नुकतीच पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांना विधानसभेत या विषयावर चर्चा घडवून आणण्याची विनंती केली होती. दरम्यान, याच विषयावर उत्तर व दक्षिण गोव्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार असून पहिली सभा ४ मे रोजी कार्मोणा पंचायत मैदानावर व त्याच दिवशी दुसरी सभा बाणावलीत होणार आहे.