कालवी पूल बांधकामावेळी कामगार पडून ठार

0
55

हळदोणा येथील कालवी नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असताना वर काम करणार्‍या दीपक पटेल (२३, माशेल) या कामगाराचे निधन झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली.

जखमी स्थितीत या कामगाराला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले असता येथे त्याला मृत घोषित करण्यात आले. उपनिरीक्षक रत्नकांत कळंगुटकर यांनी पंचनामा केला.