Home बातम्या गोव्याने ज्ञानाधिष्ठीत उपक्रमांवर विशेष भर द्यावा : डॉ. माशेलकर

गोव्याने ज्ञानाधिष्ठीत उपक्रमांवर विशेष भर द्यावा : डॉ. माशेलकर

0

माशेलकर समितीने सरकारला सादर केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटसची कशा पध्दतीने अंमलबजावणी करावी, या विषयावर काल दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात माशेलकर बोलत होते. अशा प्रकारचा व्हिजन डॉक्युमेन्टस देशातील पहिलाच असल्याने राष्ट्रीय पातळीवरही विकासासाठी अशा प्रकारचा डॉक्युमेंटस तयार करावा यासाठी गोव्याच्या डॉक्युमेन्टच्या प्रती देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सादर केल्याची माहिती डॉ. माशेलकर यांनी दिली.

एकविसाव्या शतकातील वातावरण, गरजा यानुसार मानसिकता तयार करण्याची गरज व्यक्त करून वरील डॉक्युमेन्टसमध्ये केलेल्या शिफारसीवर युवकांनीच विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. सर्वसामान्य गोमंतकीय यांच्या जीवनात बदल करणे हा ‘डॉक्युमेन्टस’चा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा म्हणजे इश्‍वराने देशाला दिलेले एक सुंदर बक्षीस असून या प्रदेशाची सुंदरता व प्रतिष्ठा सांभाळणे हे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या सरकारने गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘व्हिजन डॉक्युमेन्टस’ तयार करण्याचे ठरविले. नव्या सरकारने ही त्यात स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे गोव्याच्या भविष्य काळातील विकासासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, असे डॉ. ’ाशेलकर यांनी स्पष्ट केले.

इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष तथा विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी स्वागत केले. वरील विषयावर झालेल्या परिसंवादात माजी गोवा राज्य निवडणूक आयुक्त प्रभाकर तिंबले, एपेक्स पॅकेजिंग प्रॉडक्स लिमिटेडचे यतीन काकोडकर, डॉ. ऑस्कर रिबेलो, प्रसिध्द आर्किटेक्ट राहूल देशपांडे, आदिंनी भाग घेतला.