गोव्यात कोविड रुग्णांवर पहिल्यांदाच कॉकटेल उपचार

0
128

गोव्यातील एका कोविड रुग्णावर नुकतीच ऍन्टीबॉडी कॉकटेल उपचार करण्यात आले. मडगाव येथील होरायझन या खासगी इस्पितळातील एक डॉक्टर प्रवीण भट यांनी एका कोविड रुग्णावर गोमेकॉत ऍन्टीबॉडी कॉकटेलने उपचार केले. अशा पद्धतीने राज्यातील एका कोविड रुग्णावर उपचार करणारे ते पहिलेच डॉक्टर ठरले आहेत. कॅसिरीविमब व इमदेवीमाब या दोन औषधांपासून हे कॉकटेल तयार करण्यात आलेले आहे. कोविड रुग्णांसाठी दिली जाणारी ही एक नवी व प्रभावी अशी उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आल्यानंतर कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे ७० टक्क्यांनी कमी झाले असल्याचे आढळून आले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.