गोव्यातील राज्यसभा निवडणूक लांबणीवर

0
92

गोव्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या ८ जून रोजी होणार असलेली निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ८ जूनच्या निवडणुकीसाठी याआधी काढलेली अधिसूचना या निर्णयामुळे स्थगित ठेवण्यात आली आहे.
या निवडणुकीची नवीन तारीख नंतर जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी वरील निवडणुकीत आपला पाठिंबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उमेदवारालाच असेल असे काल पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर सांगितले.
मगो व गोवा ङ्गॉरवर्डने वेगळी भूमिका घेतल्यास अपक्ष म्हणून आपले धोरण काय असेल, असे विचारले असता काहीही ङ्गरक पडणार नाही, असे सांगून निवडणुकीपूर्वीच आपण पर्रीकरांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते, असे ते म्हणाले.
दरम्यान, गोव्याबरोबरच गुजरात व प. बंगाल या राज्यांमध्येही येत्या ८ जून रोजी होणार्‍या राज्यसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.