‘त्या’ लष्करी अधिकार्‍याचा गौरव

0
92

काश्मीरमध्ये अलीकडेच उग्र निदर्शनांदरम्यान एका निदर्शकालाच आपल्या जीपच्या बॉनेटला बांधून नेलेल्या मेजर लितूल गोगोई या अधिकार्‍याला लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी विशेष पुरस्कार बहाल केला आहे. लष्कर प्रमुख प्रशंसा कार्डच्या स्वरुपातील हा पुरस्कार प्रतिष्ठेचा असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले. गोगोई यांची सदर कृती म्हणजे निदर्शकांविरोधातील मानवी ढाल अशा स्वरुपाची ठरली.
लष्कराने राबविलेल्या घुसखोरी विरोधी मोहिमेत गोगोई यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ९ एप्रिल रोजी श्रीनगरमधील पोटनिवडणुकी वेळी गोगोई यांनी वरील कृती केली होती. काश्मीरच्या बुदगाम येथे सुरक्षा दलांवर तेथील नागरिकांकडून जोरदार दगडङ्गेक केली जात होती. त्यावर उपाय म्हणून गोगोई यांनी स्थानिक ङ्गारूक अहमद दर याला जीपच्या बॉनेटला बांधले व आपल्या लष्करी तुकडीला घेऊन ते सदर भागात ङ्गिरले होते. दर यांना बॉनेटवर बांधल्यामुळे लोकांकडून होणारी दगडङ्गेक थांबली होती. मेजर गोगाई यांच्या कृतीचे जनरल रावत यांनी तसेच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही समर्थन केले होते. १५ एप्रिल रोजी वरील घटनेची लष्करी चौकशी केली होती.