म्हादई लवाद सुनावणी ४ जुलैपर्यंत स्थगित

0
110

म्हादईप्रश्‍नी सोमवारी होणारी सुनावणी ४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून लवादाचे चेअरमन हे सुनावणीस हजर राहू शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राथमिक स्तरावर लवादाच्या दोन सदस्यांनी सुनावणी सुरू ठेवण्याबाबत विचार मंथन झाले होते व तिन्ही राज्यांकडून याबाबत मते मागवली होती. आत्माराम नाडकर्णी यांनी गोवा राज्यपालांची अधिकृत मान्यता घेऊन सुनावणी चालू ठेवण्यास आपला पाठिंबा दिला होता व साथीदाराची उलटतपासणी सुरू ठेवून वेळ व पैसा वाया जाणार नसल्याचे सुनावणी चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र कर्नाटकाने याला आक्षेप घेतला व सुनावणीस नकार दिला. गोव्याने बुधवारी सुनावणी घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र कर्नाटकाचा डाव उघडा पडलेला असल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे ४ जुलैपर्यंत सुनावणी स्थगित ठेवण्यात आली आहे.