गोव्यातील आंतरराष्ट्रीय योग दिनास तीन हजार युवक सहभागी होणार

0
93

१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून तीन हजार गोमंतकीय युवक सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकाधिक तीन हजार विद्यार्थी, कॅबिनेट मंत्री, आमदार, सरकारचे सचिव, खात्यातील प्रमुख, व्यावसायिक तसेच डॉक्टर्स योग दिनात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता उद्घाटन होईल.

पाच वेगळ्या गटांत सकाळी ९ ते १० अशा पाच सत्रांत योगा संपन्न होणार आहे. तपोभूमी कुंडई येथील पद्मनाभ संप्रदायातर्फे योगा होणार आहे. तद्नंतर सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंगतफेर् योग सादर होईल. दुपारी २.३० ते ३.३० वाजेपर्यंत समर्पण ध्यानयोग, संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत पंतजली आणि ब्रह्मकुमारी योग व संध्याकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत व्यावसायिक आणि कृषी तज्ञांचा शिवयोग संपन्न होणार आहे.
योग दिनावर चर्चा आणि आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव अमेय अभ्यंकर यांनी पर्वरीतील सचिवालयातील परिषदगृहात काल खाते प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव गोविंद पर्वतकर हेही उपस्थित होते. बैठकीत शामियाना उभारण्याची व्यवस्था, स्क्रिनिंग, पाणीपुरवठा, स्वयंसेवक सहभाग अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. श्यामाप्रसाद स्टेडियमच्या जागेची पाहणी करणे तसेच आवश्यक व्यवस्था पाहण्यासाठी डॉ. श्यामा प्रसाद स्टेडियमला भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.