इंग्लंडचा वेल्सवर झुंजार विजय

0
84

डॅनिएल स्टुरीडजने ‘इंज्युरी टाइम’मध्ये नोंदलेल्या गोलवर इंग्लंडने प्रारंभिक गोलपिछाडीनंतरही वेल्सवर २-१ असा विजय मिळवित युरो २०१६ फुटबॉल स्पर्धेच्या ब गटात ४ गुणासह अग्रस्थानावर झेप घेतली.

लेन्स येथील या सामन्यात वेल्सने पूर्वार्धात नियंत्रण प्रस्थापिताना १-० अशी आघाडी घेतली होती.  ४२व्या मिनिटाला गॅरेथ बेलने ३० यार्डवरील फ्रीकिकवर इंग्लंडचा गोलरक्षक ज्यो हार्टसला चकवीत वेल्सचा आघाडीचा गोल नोंदला.
उत्तरार्धात मॅनेंजर रॉय हॉजसन यांनी रहीम स्टर्लिंग आणि हॅरी केन यांच्या जागी अनुक्रमे जेमी वार्डी आणि स्टुरिडज यांनी उतरविले आणि ही चार यशस्वी ठरली. ५६व्या मिनिटाला वार्डीने इंग्लंडचा बरोबरीचा गोल केला. बरोबरीनंतर इंग्लंडने नव्या जोमाने आक्रमणे केली आणि इंज्युरी टाइमध्यें स्टुरिडजने विलक्षण चपळाईत वेल्सचा गोलरक्षक वायने हॅनेसेयला चकवीत इंग्लंडला दुसरा गोल नोंदवित संघाला पहिला विजय मिळवून
दिला. इंग्लंडच्या बचावफळीत खंबीरपणे ठाकलेल्या कायल वॉकरची सामनावीर म्हणून निवड झाली. या विजयासह इंग्लंडने ब गटात चार गुणासह अग्रस्थान मिळविले.
फ्रान्स अंतिम सोळात.
मार्सेली : दरम्यान, नवोदित अल्बानियावर २-० असा संघर्षमय विजय मिळवित यजमान फ्रान्सने सर्वप्रथम युरो २०१६ स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
वेलोड्रोम स्टेडियमवरील या उत्कंठावर्धक सामन्यात ४२व्या रँकिंगच्या अल्बानियाने दोन वेळच्या युरोंपियन विजेत्या कडवी झुंज देताना ८९व्या मिनिटापर्यंत गोलबरोबरीत रोखले होते. अखेर ९०व्या मिनिटाला राखीव अँथनी ग्रीजमानने हेडरद्वारे यजमानांचा आघाडीचा गोल नोंदला आणि इंज्युरी टाइममधील सहाव्या मिनिटाला मध्यंरक्षक तथा सामनावीर दिमित्री पायटेने दुसरा व विजयावर शिक्कामोर्तब (२-०) करणारा गोल नोंदला. पहिल्या सामन्याप्रमाणे फ्रान्सच्या खेळात सफाईदारपणा तथा सदोष नेमबाजी प्रकर्षांने जाणवली. या स्पर्धेत १७व्या रँकिंगच्या फ्रान्सने नोंदलेल्या चार गोलातील तीन अंतिमक्षणात झाले आहेत.
स्वित्झर्लंडने रुमानियाला रोखले
पॅरिस : दरम्यान, अ गटातील अन्य एका स्वित्झर्लंडने रुमानियाला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.
पार्क डेस प्रिन्सेेस स्टेडियमवरील या सामन्यात बोगदान स्टॅन्कूने १८व्या मिनिटाला पेनल्टीवर रुमानियाचा आघाडीचा गोल नोंदल. तथापि, उत्तराधार्धत ५७व्या मिनिटाला ऍडमिर मेहमेंडीने स्वित्झर्लंडचा बरोबरीचा गोल नोंदला.
या अनिर्णिततेसह स्वित्झर्लंडने अ गटात चार गुणासह फ्रान्सहून(६) दोन गुणांच्या पिछाडीनेेेेेेे दुसरे स्थान मिळविले. त्यापाठोपाठ रुमानिया (१) आणि अल्बानिया (०) असा क्रम आहे.
स्लोवाकियाचा रशियाला दणका
दरम्यान, ब गटातील सामन्यात स्लोवाकियाने रशियावर २-१ असा सनसनाटी विजय प्राप्त केला. ब्लादिमिर वाइस (३२वे मिनिट) आणि मॅरेक हॅमसिक (४५वे मिनिट) यांनी विजेत्या स्लोवाकियातर्फे तर रशियाचा एकमात्र गोल डेनिस ग्लुशाकोवने (८० वे मिनिट) नोंदला.
२४व्या क्रमांकाच्या स्लोवाकियाचा हा स्पर्धेंतील पहिला विजय असून बाद फेरीच्या आशा प्रज्वलीत झालेल्या आहेत तर रशियाला अंतिम सोळा संघात स्थान मिळविण्याचे आव्हान जिवंत राखण्यासाठी वेल्सवर मात करणे क्रमप्राप्त आहे.