गोव्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फाजल यांचे निधन

0
106

गोव्याचे व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल अर्थतज्ज्ञ मोहम्मद फाझल यांचे काल वयाच्या ९३व्या वर्षी त्यांच्या मूळ गावी अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे निधन झाले. १९९९ साली त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर २००२ ते २००४ सालादरम्यान, ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. फाझल यांचा जन्म गर्भश्रीमंत जमीनदारांच्या घरात झाला. अलाहाबाद विद्यापीठात पदवी घेतल्यानंतर लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये त्यांनी पुढील उच्च शिक्षण घेतले. १९७७ साली त्यांना औद्योगिक विकास खात्याचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. १९८० ते ८५ दरम्यान, ते नियोजन आयोगाचे वरिष्ठ सदस्य होते. दरम्यान, फाझल यांच्या निधनाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी दु:ख व्यक्त केले.